Lava Probuds in Low Range Limited Time Offer Valid 3 Minutes
भारतीय कंपनी Magma ने आपला नवीन नेकबँड Magma Probuds N11 लॉंच केला आहे. तसे, कंपनीने आपल्या Probuds N11 ची किंमत 1499 रुपये ठेवली आहे. पण आता कंपनीचा हा आकर्षक फीचर्स असणारा नेकबँड फक्त 11 रुपयांत मिळू शकतो. कसं ते वाचा सविस्तर..
लावा कंपनीने Probuds N11 ला एका खास ऑफरसह आणलं असून ग्राहक यामुळे केवळ 11 रुपयांमध्ये 1499 रुपये किंमतीचा Probuds n11 नेकबँड खरेदी करू शकतात. जर तुम्हालाही Probuds n11 खरेदी करायचे असेल तर यासाठी ही ऑफर 10 सप्टेंबर 2022 पासून सकाळी 11 वाजता सुरू होणार आहे आणि महत्वाचं म्हणजे या ऑफरच्या अंतर्गत ग्राहकांना 12 सप्टेंबर 2022 पर्यंत ई-कॉमर्स वेबसाईट Amazon वरून Magma चे नवीन Probuds N11 फक्त 11 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. पण ही ऑफर येत्या 3 दिवसांसाठी काही मिनिटांसाठीच असणार आहे.
आता ग्राहकांना संधीचा फायदा कसा घ्यायचा हे पाहावं लागणार आहे. जर या ऑफरचा फायदा घेता आला नाही तरी ग्राहकांना हा नेकबँड खरेदी करण्याची आणखी एक संधी मिळेल. 11 रुपयांची ऑफर संपल्यानंतर दिनांक 13 सप्टेंबर ते 16 सप्टेंबरपर्यंत ग्राहक 999 रुपयांच्या किंमतीत Probuds N11 खरेदी करू शकणार आहेत. यानंतर मात्र ही ऑफरही संपली तर Probuds N11 नेकबँड 17 सप्टेंबर 2022 पासून लावाच्या ई-स्टोअर, Amazon आणि कंपनीच्या भारतातील स्टोअरवर 1499 रुपयांत मिळतील.
काही आकर्षक फीचर्स:
▪️ Magma Probuds N11 फायरफ्लाय ग्रीन, काई ऑरेंज आणि पँथर ब्लॅक या तीन रंगांमध्ये उपलब्ध असणार
▪️ ड्युअल हॉल स्विच फंक्शन डॅश स्विच, टर्बो लेटन्सी, प्रो गेम मोड, नॉइज कॅन्सलेशन सारखे फीचर्स
▪️ हा नेकबँड IPX6 वॉटर रेझिस्टेन्ट टेक्नोलॉजीसह सादर केला आहे जो घाम आणि पाण्यापासून सुरक्षित ठेवेल.
▪️ Magma Probuds N11 मध्ये 280 mAh बॅटरी आहे जी 42 तासांपर्यंत प्लेबॅक टाईम देईल, असा कंपनीचा दावा आहे. 10 मिनिटांत चार्ज होणारा हा नेकबँड 13 तासांपर्यंत बॅकअप देतो.


Comments